सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Kiwale : कोयत्याचा धाक दाखवत जमीन मालकास काम करण्यास केला मज्जाव

एमपीसी न्यूज – तुला काम करायचे असेल, तर पैसे दे नाही तर जीव घेईन अशी धमकी देत जमीन मालकाला जमीनीवर काम करण्यास मज्जाव केल्याची घटना किवळे (Kiwale) येथे घडली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.13) किवळे येथे दुपारी पावणे चार वाजता घडला.

बाळासाहेब व्यंकटराव गायकवाड (वय 49 रा. निगडी) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी अंतेश्वर सुदाम तरस (वय 31, रा. किवळे), संगमेश्वर सुदाम तरस (वय 33, रा. किवळे), सयाजी दासु शिंदे (वय. 29 रा.तळेगाव स्टेशन) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्या सोबत दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची किवळे येथे जागा आहे. त्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी व साफससफाई करण्यासाठी फिर्यादी हे जेसीबी व सोबत काही माणसे घेऊन गेले.

यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी फिर्यादी यांनी तुम्हाला पैसे दिले आहेत. तरी का अडवता अशी विचारणा केली. यावेळी आरोपीने माझ्या बायकोचा हिस्सा मला मिळालेला नाही. तसेच बांधल्या जाणाऱ्या बिल्डींगमध्ये दोन फ्लॅट दे तरच तुला काम करु देऊ, असे सांगून जवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीतून कोयता आणत तुला जिवे मारून टाकील अशी धमकी दिली. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Talegaon Dabhade : शहर काँग्रेसकडून आझाद गौरव यात्रा

spot_img
Latest news
Related news