Kiwale : युवा पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव व्हावी यासाठी किल्ला स्पर्धा आवश्यक – नाना शिवले

एमपीसी न्यूज – नव्या पिढीला शिवरायांच्या व महाराष्ट्राच्या (Kiwale) पराक्रमाची जाणीव व्हावी यासाठी किल्ले स्पर्धा आवश्यक आहेत. गड-किल्ले आपल्याला प्रेरणा देतात, इतिहासाची साक्ष देतात आणि राष्ट्रभक्ती शिकवतात. प्रत्येकाने शिवचरित्र, ऐतिहासिक ग्रंथ वाचले पाहिजेत, असे मत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.नाना शिवले यांनी व्यक्त केले.

किल्ले अभ्यास समिती किवळेगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे दिवाळीमध्ये पुणे जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवराय महानाट्य चे लेखक व दिग्दर्शक सुदामराव तरस, नगरसेवक बाळासाहेब तरस, युवा आधार संस्थेचे अध्यक्ष शाम भोसले, शिव व्याख्याते शिवाजी धुमाळ, पर्यवेक्षिका स्नेहलता साळवे, पिंपरी-चिंचवड शिवसेनाप्रमुख निलेश गुलाब तरस, युवा कार्यकर्ते नवनाथ तरस, किरण धुमाळ, निलेश साळुंखे, तानाजी येळवंडे, प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते

यावेळी किल्ले बनवा स्पर्धेत विजय प्राप्त झालेल्या स्पर्धकांना पुढीलप्रमाणे बक्षीस प्रमुख पाहुण्याच्या हस्ते श्री बापदेव महाराज मंगल कार्यालय किवळे येथे देण्यात आले.

हिरोजी इंदुलकर सर्वोत्कृष्ट किल्ला पुरस्कार 2023 प्रतापगड क्रांतिवीर मित्र मंडळ माळीनगर श्रीक्षेत्र देहूगाव. (Kiwale)

लहान गट-

रेखीव किल्ला प्रथम क्रमांक, रायगड निर्वाना सोसायटी, द्वितीय क्रमांक सिंहगड ईश्वरी धुमाळ, तृतीय क्रमांक. प्रतापगड नाद सह्याद्री ग्रुप संस्कृती कातळे, उत्तेजनार्थ सिंहगड आर्यन तरस

मोठा गट

प्रथम क्रमांक.तोरणा विशांत पिंजन विठ्ठलवाडी देहूगाव, द्वितीय क्रमांक पारगड ऋतिक काळोखे (काळोखे मळा)देहुगाव, तृतीय क्रमांक राजगड ऋषिकेश जरे कोतवाल नगर किवळे, उत्तेजनार्थ प्रतापगड वरद विकास कातळे, उत्तेजनार्थ तोरणा विराज निलेश साळुंखे शिव साम्राज्य प्रतिष्ठान साळुंखे वस्ती.

Pune : उद्धव ठाकरे यांना अटक केली तर महाराष्ट्रात वनवा पेटवू; युवासेनेच्या शरद कोळी यांचा सरकारला इशारा

या स्पर्धेत 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा असे विविध किल्ले बनविले होते. या कार्यक्रमात युवा पिढीला इतिहास समजावा याकरिता किवळेगाव येथे लवकरच ऐतिहासिक पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याचे आश्वासन बाळासाहेब तरस यांनी दिले. तसेच सुदामराव तरस यांच्या सूचनेनुसार दरवर्षी व्याख्यानमाला सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किल्ले अभ्यास समितीचे संस्थापक व अध्यक्ष अलंकार साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास युवा कराटे ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक विशाल तरस तसेच कु. भिमांशू साळवे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.