Kiwale :  किवळे  दुर्घटना ! अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार

एमपीसी न्यूज – किवळे येथील होर्डिंग कोसळून झालेल्या  दुर्घटनेची सखोल चौकशी करून (Kiwale) अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

लोखंडी होर्डिंग कोसळल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी जागामालकासह चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकरणाची  सखोल चौकशी करून दोषी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. त्याबाबतचा अहवाल आठ दिवसात पाठविण्यात यावा, असे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी दिले आहेत.

MPSC Result News : दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

या दुर्घनेत मृत्यू झालेल्या पाच जणांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार मदतीचे 15 लाख रुपये पुणे जिल्हाधिकारी, पुणे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आले आहेत.

त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही रक्कम पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार यांच्याकडे धनादेशाद्वारे वितरित केली आहे. हे धनादेश मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटवून तत्काळ देण्यात येणार (Kiwale) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.