Kiwale News : विकासनगरमधील नेत्र चिकित्सा शिबिरात 303 नागरिकांची तपासणी

एमपीसीन्यूज : श्री. राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर आणि डॉ. सुनील वानखेडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला किवळे-विकासनगरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 303 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 38 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तर 258 नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विकासनगर येथील डॉ. सुनील वानखेडे हॉस्पिटलमध्ये हे शिबीर पार पडले. शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख नवनाथ तरस, देहूरोड शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, विभागप्रमुख विजू थोरी, सावळेराम वानखेडे, शुभांगी वानखेडे, डॉ.  मोहन पवार, डॉ.  राजहंस बोकरे, डॉ.  प्रताप खडसे, जावेद बेग, निलेश चांभारे, युवा सेनेचे विशाल दांगट, माजी उपसरपंच बापूसाहेब तरस, किवळे रावेत सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब तरस, रवींद्र चव्हाण, उद्योजक विलास तरस, आयुब खान, अंकुश तरस, दिलीप दांगट, रवींद्र कदम, सुरेश लुणावत, युवा आधार संघटनेचे अध्यक्ष श्याम भोसले, तुषार तरस, विशाल तरस, रोहन साबळे, देवेंद्र तरस, अनिल तरस, बाळासाहेब शांताराम तरस, सचिन शिंगाडे, रुपेश तावरे, नितीन जाधव, सुनील वाघमारे, सागर लांगे, मेहेरबान सिंग, सनी लोखंडे, मंगेश कडू, शिवाजी दांगट, बाळासाहेब मराठे, राजेंद्र नेटके, विनोद बनसोडे, धीरज बाबर, विकास तरस, शुभम तरस, विशाल मारुती तरस, गणेश जुनवणे, गौरव तरस, अमोल सुदामे, प्रकाश जाधव, प्रवीण ठोकले, सुरेश वाल्मिकी आदी उपस्थित होते.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे आणि मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी शिबिराला भेट दिली. दरम्यान, मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नोंदणी झालेल्या नागरिकांची याचा महिन्यात हडपसर येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयात मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक राजेंद्र तरस यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.