Kiwale News : तीन वर्षाच्या मुलीने गिळले एक रूपयाचं नाणं, दोन तासानंतर काढले बाहेर

एमपीसी न्यूज – तीन वर्षाच्या मुलीने गिळलेले एक रुपयाचे नाणं दोन तासानंतर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रविवारी (दि.19) देहूरोड परिसरात ही घटना घडली. किवळे येथील वरद रुग्णालयात मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

देहूरोड परिसरातील तीन वर्षाच्या मुलीने एक रुपयाचे नाणे गिळले, गिळल्याले नाणं मुलीच्या घशात अडकले. मुलीच्या पालकांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेतली पण, घटना दुर्मिळ असल्याने उपचार उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर मुलीला किवळे येथील वरद रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शस्त्रक्रिया लवकर करण्याचे डॉक्टरांसमोर आव्हान होते.

भूलतज्ज्ञ डॉ. दत्तेश गोरे यांनी व इंडोस्कोपी सर्जन डॉ. संदेश गावडे यांच्या प्रयत्नांनी दोन तासानंतर नाणं बाहेर काढण्यात यश आले. मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. यासाठी डॉ. मंजिरी अहिरराव, डॉ. हितेंद्र अहिरराव, डॉ. दत्तेश गोरे, डॉ. संदेश गावडे, डॉ. सीमा यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.