Kiwale News : किमान चार तास तरी दुकाने उघडण्याची परवानगी द्या ; सलून व्यवसायिकांची मागणी

एमपीसीन्यूज : सलून दुकाने बंद ठेवल्यास दुकान भाडे, लाइट बिल, कर्जाचा हफ्ता आणि कामगाराचा पगार देऊन कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा. आमच्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या लोकांचा विचार महापालिका आयुक्त यांनी करावा. पालिका ज्या नियम, अटी लागू करेल त्या सर्व सलून दुकानदार- मालकांना मान्य असतील. त्यामुळे कमीत कमी तीन तास तरी दुकान उघडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी किवळे-विकासनगर येथील सलून व्यावसायिकांनी केल्या आहेत.

याबाबत किवळे- विकासनगर नाभिक संघटनेच्या पदाधिकारी आणि सर्व सलून मालकांनी शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांची भेट घेत महापालिका  आयुक्त राजेश पाटील यांच्यापर्यंत आमचा मागण्या पोहोचवण्याची विनंती केली.

सलून दुकाने बंद ठेवून सर्व दुकानदार मालकांना दुकान भाडे, लाइट बिल, कामगाराचा पगार देऊन कुटुंबाचा खर्च जगविणे अवघड होणार आहे. आमच्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या लोकांचा विचार महापालिका आयुक्त यांनी करावा. पालिका ज्या नियम, अटी लागू करेल त्या सर्व सलून दुकानदार- मालकांना मान्य असतील.

कमीत कमी तीन तास तरी दुकान उघडण्याची मुभा द्यावी. सर्व नियम आणि अटी पळून आम्ही व्यवसाय करू. पण दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा सलून मालक व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

सलून दुकाने उघडणे शक्य नसल्यास महापालिकेतर्फे सर्व नाभिक दुकानदारांना मानधन स्वरूपात मदत करावी, अशी मागणी नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्या महापलिका आयुक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांना साकडे घातले आहे.

दरम्यान, नाभिक समाज बांधवांच्या मागण्या महापालिका आयुक्तांपर्यंत पोहोचविणार असल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.