Kiwale News : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 6161 रुपयांची एफडी

एमपीसीन्यूज : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त युवा सेना आणि राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्यावतीने उद्या, मंगळवारी प्रभाग क्रमांक 16 विकासनगर -किवळे येथील रिक्षा चालकांना मोफत गॅस पुरवठा, दारिद्रय रेषेखालील कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 6161 रुपयांची एफडी, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, अल्प दारात वॉटर प्युरिफायरचे वाटप आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी या उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत माहिती देताना तरस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या ६१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त अनावश्यक खर्च टाळून दारिद्रय रेषेखालील कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 6161 रुपयांची एफडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या विकासनगर येथील रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस भरून देण्यात येणार आहे.

गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असलेले पाणी खूप खराब येत असल्याने नागरिकांना अल्प दरात वॉटर प्युरिफायरचेही वाटप करण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.