Kiwale News : विकासनगर परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; राजेंद्र तरस यांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसीन्यूज : दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाऱ्यालागत नदी पात्रात मासे मृतावस्थेत आढळले. परिणामी विकासनगर, दत्तनगर आणि किवळे परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करीत शिवसेना कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

रसायनमिश्रित पाणी पवना नदीमध्ये सोडल्यामुळे नदी शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले होते. या बाबत माहिती मिळताच महापौर उषा ढोरे यांनी तात्काळ रावेत येथील पवना नदीपात्राला भेट देत पाहणी केली हाती.

त्यानंतर विकासनगर, दत्तनगर आणि किवळे परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला.
त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, आज शुक्रवारी दत्तनगर भागांमध्ये काही नागरिकांच्या घरी पाण्याला दुर्गंधी येऊ लागताच त्यांनी तात्काळ शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनायाबाबत माहिती दिली.

त्यावर तरस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी पाण्याची टॅप्सनी करु, चौकशी करु, असे उत्तर दिले. मात्र, त्यानंतरही या भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तक्रार करुनही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापुढे हा प्रकार असाच सुरु राहिल्यास पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेंद्र तरस यांनी दिला आहे. तसेच या प्रश्नी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीच स्वतः लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.