kiwale News : विकासनगर येथील वेशभूषा स्पर्धेत ग्रितिका जाधवला विजेतेपद

एमपीसीन्यूज : विकासनगर, किवळे येथे श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन  यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेत ग्रितिका कृष्णा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने राष्ट्रमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दत्तनगर भागातील दत्तमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाउंडेशनचे संस्थापकी अध्यक्ष व युवा शिवसैनिक राजेंद्र तरस, माजी सरपंच सुदाम तरस, शिवव्याख्याते शिवाजीराव धुमाळ, गुणवंत कामगार रवींद्र कदम, दीपक तरस, संतोष तरस, मोरेश्वर तरस, मुरली नायर, शिवाजीराव तरस, नारायण कुलकर्णी, ललिता तरस, संगीता तरस, सुनीता चंदनेपाटील, कुसुम तरस, स्मिता तरस, हौसाबाई तरस आदी उपस्थित होते. यावेळी एंजल पब्लिक स्कूलच्या प्राचार्य ॲड. शुभांगी तरस यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या वेशभूषा स्पर्धेत एकूण 12 मुली आणि एका मुलाने सहभाग घेतला. यामध्ये ग्रितिका कृष्णा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर आरोही राहुल तरस, समृद्धी ज्ञानेश्वर अदबिले आणि देवश्री देवेंद्र तरस यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला.

या सर्वांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. या विजेत्या स्पर्धकांना मेकअपचा सेट बक्षीस म्हणून देण्यात आला. तर गौरव चंदने याने बाल शिवबांची वेशभूषा सादर केली होती.

आजच्या आधुनिक युगात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती आयोजक राजेंद्र तरस यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.