Kiwale News : ‘पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ते दीड फूट खोदून डांबरीकरण करा’

शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसीन्यूज : पावसाळयात वाहून येणारे पाणी रस्त्यालगतच्या दुकानांसह घरांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी रस्ते डांबरीकरण करताना ते दीड ते दोन फूट खोदून डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांनी केली आहे.

या संदर्भात तरस यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. याबाबत अधिक माहिती देताना तरस म्हणाले, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16  मध्ये किवळे, विकासनगर, मामुर्डी या परिवारात दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे वाहून येणारे पाणी रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये जाते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडते. हे चित्र दरवर्षी पहायला मिळते.

रस्ते डांबरीकरणाची कामे करताना रस्त्यावर डांबर टाकले जाते. त्यामुळे रस्त्याची उंची वाढते व रस्त्यालगतची घरे, दुकाने यांची उंची कमी होते. परिमाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत येणारे पाणी घरांमध्ये आणि दुकानमंध्ये जाते. हे टाळण्यासाठी डांबरीकरण करण्यापूर्वी रस्ते दीड ते दोन फूट खोल खोदावेत.

त्यामुळे रस्त्यांची उंची लगतची घरे आणि दुकानांपेक्षा मोठी होणार नाही. तसेच पावसाळ्यात घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसण्याची समस्याही निर्माण होणार नाही. शिवाय नागरिकांना गैरसोयींचा सामनाही करावा लागणार नाही, असे तरस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.