Kiwale News : किवळे परिसरात सेल्फी विथ गौरी गणपती सजावट स्पर्धा

एमपीसी न्यूज – विकासनगर येथील राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन आणि रणझुंजार महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त किवळे-विकासनगर परिसरासाठी सेल्फी विथ गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी दिली.

ही स्पर्धा घरगुती गणपतीसाठी आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशभक्तांनी आपल्या घरातील गौरी गणपतीच्या सजावटीचा आणि सेल्फी असे दोन फोटो काढून ते 15 सप्टेंबरपर्यंत  8308039604 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 4444, 3333, 2222, 1111 अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच इतर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी फाउंडेशनच्या विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र तरस यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.