Vikasnagar News : राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वैकुंठ रथाचे मंगळवारी लोकार्पण

एमपीसीन्यूज : विकासनगर,  किवळे येथील श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या ( Shir Rajendra Taras Social Foundation)  वतीने तयार करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे ( Vaikunth Rath) उद्या मंगळवारी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे ( shivsena Mp Shrirang Barne) यांच्या हस्ते लोकार्पण ( Dedication) करण्यात येणार आहे.

विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी पाच वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांच्या पुढाकारातून हा वैकुंठ रथ उपलब्ध करण्यात येणार आहे. परिसरातील मृत व्यक्तींना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी या रथाचा उपयोग करण्यात आला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीचे ( shivsena chief Balasaheb Thackeray Jayanti) औचित्य साधून राजेंद्र तरस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.