Kiwale : किवळे येथे रोहीत्रातील ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला

एमपीसी न्यूज – किवळे येथे तरसवस्ती मधील नाल्याशेजारी (Kiwale)असलेल्या विद्युत रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला गेल्या. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.

महावितरण देहूरोड शाखेचे सहायक (Kiwale)अभियंता मनोज पुरोहित यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

PCMC : एलजीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण कर्मचा-यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसवस्ती किवळे येथे नाल्याच्या शेजारी महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. अज्ञात चोरट्याने रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा एकूण 55 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.