Kiwale : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सार्वजनिक सभ्यतेचा (Kiwale) भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 25) दुपारी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.

समाजसेवक विकास घोरपडे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 32 आणि 24 वर्षीय दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही महिलांना समजपत्र देऊन सोडून दिले आहे.

Bhosari : चिटफंडच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास (Kiwale) दोन महिला देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करीत होत्या. दोन्ही महिला सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होईल असे कृत्य करत असल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.