Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज – पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली. 

राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरस हे त्यांची साडेपाच लाख रूपये किमतीची वेरना मोटार रस्त्याकडेला उभी करून बाहेर मोबाईलवर बोलत थांबले होते. यावेळी आरोपींनी येऊन तरस यांना पैसे मागितले. तरस यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी तरस यांच्घ्याकडील मोटारीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि मोटार घेऊन पोबारा केला. फौजदार जगताप तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.