Lonavala Trip : किवळेच्या कुटुंबीयांना लोणावळा ट्रीप पडली लाखभर रुपयांना

एमपीसी न्यूज – लोणावळा येथे फिरण्यासाठी किवळे येथील एक कुटुंब गेले तोवर चोरट्याने घरातील रक्कमव दागिन्यावर हात साफ केला.त्यामुळे ही ट्रीप संबंधित कुटुंबीयांना लाखभर रुपयांना पडली असेच म्हणावे लागेल ही घटना शुक्रवारी (दि.9) दुपारी तीन ते शनिवारी (दि.10) रात्री दहाच्या कालावधीत आदर्शनगर, किवळे येथे घडली.

अबिदअली इलाही अलीसाहब मुलतानी (वय 32, रा. आदर्शनगर, किवळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 80 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 95 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.