Ind vs Nz Test : मुंबई कसोटीत किवी संघ चारी मुंड्या चित, भारताचा 372 धावांनी विजय 

एमपीसी न्यूज – पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीवर निर्विवाद वर्चस्व ठेवत भारताने ही कसोटी 372 धावांनी जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. 

न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या 62 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने 7 बाद 276 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला 540 धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही. या विजयासह भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 12 गुणांची कमाई केली आहे.

 

भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार तर अक्षर पटेल याने एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव – 325 / 10
न्यूझीलंड पहिला डाव – 62 / 10
भारत दुसरा डाव – 276 / 7
न्यूझीलंड दुसरा डाव – 167 / 10
भारताचा 372 धावांनी विजय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.