KL Rahul On Dhoni: संघातील धोनीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही- के एल राहुल

धोनीच्या जागी येणाऱ्या खेळाडूकडून अपेक्षा असणार यात वादच नाही. केवळ त्या एकाच नव्हे तर मैदानावरील अकरा आणि संघातील पंधरा खेळाडूंकडूनही सर्वोत्तम कामगिरी अपेक्षा असणार हे नक्की.

एमपीसी न्यूज – भारतीय माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर संघात त्याची जागा कोण घेणार याबाबत चर्चा सुरू झाली. ऋषभ पंत आणि के एल राहुल या दोघांमध्ये कोण अधिक सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडेल क्रिकेट रसिक यांच्यासह तज्ज्ञांनी आपली मतं नोंदवली. के एल राहुलला एम एस धोनीची जागा घेण्याबद्दल विचारले असता त्याने आपली भूमिका मांडली.

झूम कॉलच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना राहुलने आपली भूमिका मांडली. धोनीच्या जागी येणाऱ्या खेळाडूकडून अपेक्षा असणार यात वादच नाही. केवळ त्या एकाच नव्हे तर मैदानावरील अकरा आणि संघातील पंधरा खेळाडूंकडूनही सर्वोत्तम कामगिरी अपेक्षा असणार हे नक्की.

संघात धोनीची जागा घेणं हा विचार माझं चित्त विचलीत करत नाही. पण एक मात्र नक्की की संघातील धोनीची जागा ही कोणीही खेळाडू घेऊच शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे, असं राहुल म्हणाला

आम्ही सारे स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी संघात निवडले जातो आणि देशासाठी किंवा क्लबसाठी शक्य तितके जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो. मला संघात जी कोणतीही भूमिका पार पाडण्यास सांगितलं जाईल ते मला मान्य असेल.

एखादी भूमिका पार पाडण्याचे माझ्यात सामर्थ्य असेल म्हणून मला ते काम देण्यात येईल आणि त्याचा मला अभिमान असेल. त्यामुळे ती भूमिका बजावताना मी द्विधा मनस्थितीत राहणार नाही. माझ्या मनात संघातील भूमिकेबाबत स्पष्टता आहे आणि मी मला शक्य तितकी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन असेही तो म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.