Pune : जाणून घ्या पालखी सोहळ्यात पुण्यात कशी असेल वाहतूक व्यवस्था…

एमपीसी न्यूज – पुण्यात (Pune) संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या शहरात 12  जून रोजी एकत्रित येतात. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत.

शहरातील काही मार्ग पहाटे दोन वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसेच, पालखी दरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

 

शहरातील बंद रस्ते व पर्यायी मार्ग –

बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक).

चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).

पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).

मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).

चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील (बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे).

आर.टी.ओ. ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक (आरटीओ चौक – शाहीर अमर शेख चौक – कुंभार वेस चौक किंवा आरटीओ चौक- जहाँगीर चौक आंबेडकर सेतू ते गुंजनमार्गे).

सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (पर्णकुटी चौक-बंडगार्डन पूल-महात्मा गांधी चौकमार्गे).

कळस फाटा से बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक (धानोरी आणि अंतर्गत रस्त्याने).

मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन (जेल रोड- विमानतळ रोड मार्ग).

सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता (पर्णकुटी चौक -गुंजन चौक -जेल रोड- विश्रांतवाडी चौक).चंद्रमा चौक ते आळंदी रोड (अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा).

नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद. होळकर पूल ते चंद्रमा चौक आणि होळकर पूल ते साप्रस चौकी मार्ग बंद.

या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून, इतर रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील.

गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक- (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक).

फर्ग्युसन रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता).

शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा – कुंभारवेस चौक-आरटीओ चौक).

वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग).

मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड).

कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- 15 ऑगस्ट चौक – कमला नेहरू रुग्णालय).

– वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस 100 मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध.

– अरूणा चौक ते पारशी अगेरी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी.

पालखीच्या दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

12 जून रोजी आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी-मरकळ – तुळापूर – फुलगाव – लोणीकंद – वाघोली- लोहगाव- येरवडा मार्गाचा वापर करावा.

– इंदिरानगर, दत्तमंदिरपासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर करावा.

पालखी सोहळ्यातील वाहनांवर जीपीएस प्रणाली –

पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार केले असून  सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’ ठेवले जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.