Todays Horoscope : 25 May 2023 जाणून घ्या – आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Todays Horoscope : 25 May 2023 जाणून घ्या – आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग
वार – गुरुवार.
25..5.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- गुरुपुष्यामृत ( सूर्योदयापासून१७.५३ पर्यंत)
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पुष्य 17.53 पर्यंत, नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- निळा )
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे. होईल गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रामतील.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली नाती जवळ येतील.

कर्क (शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलल्याने काही तुमचे हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. कुणाला मोफत सल्ले वाटप करू नका.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडू शकतील घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडू शकेल.

कन्या ( शुभ रंग- मोरपाखी )
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी होईल लांबच्या प्रवासात आज सावध असलेले बरे.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आळस झटकून आज तुम्ही सकारात्मकतेने कामाला लागल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका मित्रांच्या फार नादी आज लागू नका.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा)
कामाच्या ठिकाणी आज ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल आपल्यास काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा.

धनु- (शुभ रंग- मरून)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे आज शक्य नाही संध्याकाळी तुमची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )
केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न करा. तुम्हाला आज थोडी विश्रांतीची ही गरज आहे.

कुंभ (शुभ रंग – मरून)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. तरीही कमीच बोललेले बरे.

मीन -(शुभ रंग – पांढरा )
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत आज चांगलीच सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.