Kohli Resigns as Test Captain : विराट कोहलीचा कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यांने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. पहील्यांदा एकदिवसीय, T20 नंतर आता कसोटी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून कोहली मुक्त झाला आहे.

‘मागील सात वर्षांपासून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी प्रत्येकवेळी माझ्याकडून 120 टक्के देण्याचा प्रयत्न केला. आणि आता ते करु शकत नसेल तर हीच योग्य वेळ आहे. माझ्या मनात याबाबत दुमत नाही तसेच, संघासोबत अप्रामाणिक राहू शकत नाही. बीसीसीआयने एवढ्या कालावधी साठी मला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचे आभार.’

 

विराट कोहलीने पत्राच्या शेवटी संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे आभार मानले आहेत.
विराट कोहली कसोटी फॉरमॅट मधील एक यशस्वी कर्णधार आहे. कर्णधारपदच्या कारकिर्दीत त्याने 68 कसोटी सामन्यापैकी 40 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजायात देखील त्याचा वाटा होता त्यामुळे संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला होता.
कोहलीच्या निर्णयावर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पराभवानंतर राजीनामा देणं योग्य नसून एखाद्या मालिका विजयानंतर हा निर्णय घ्यायला हवा होता असे अनेकांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.