BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांकरिता जमा होत आहे सढळ हाताने मदत

एमपीसी न्यूज : कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांकरिता लोणावळा शहरात सढळ हाताने मदत करण्याकरिता नागरिक पुढे सरसावले आहे. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी वलवण गावातील महादेव मंदिरात मदत एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी वलवण ग्रामस्तासह लोणावळा भागातील ग्रामस्त वरसोली, वाकसई, कुसगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्तांनी मदत जमा करायला सुरुवात केली आहे. पूरग्रस्त नागरिकांना किमान महिनाभर पूरेल एवढे साहित्य जमा करण्यात येणार आहे. किराणा साहित्याप्रमाणे कपडे, पिण्याचे पाणी व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू संकलन करणे सुरु करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवस ही मदत जमा करून ती सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये वाटप केली जाणार आहे.

लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने गवळीवाडा परिसरात मदतफेरी काढत साहित्य व जमा रोख रक्कमेतून अधिकचे साहित्य श्रीराम मंदिर गवळीवाडा येथे जमा केले आहे. तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने अडीचशे कुटुंबाला काही दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य जमा केले आहे. यासह शिवसेना वाहतूक सेना, कार्ला ग्रामस्त यांनी देखील मदतीकरिता पुढाकार घेतला असून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या आहेत. लवकरच ही सर्व मदत पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. श

शहरी व ग्रामीण भागातील नागरिक देखील सढळ हाताने मदत जमा करत असून ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे. त्यांनी महादेव मंदिर वलवण येथे यथाशक्ती साहित्यरुपाने मदत जमा करत पूरग्रस्त बांधवांचे संसार उभे करण्याकरिता हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य वाटपासोबत किमान शंभर युवकांची टीम सांगली भागातील गावात श्रमदान करणार आहे. राजकीय पक्षांसोबतच शहरातील शाळा, महाविद्यालये व लायन्स, रोटरी या सेवाभावी संस्था व सामाजिक संघटना हे देखील आपआपल्या पद्धतीने मदत गोळा करत आहेत. लोणावळेकर व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक मदतीकरिता पुढे सरसावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3