Kolhapur Hospital Fire : सीपीआर रुग्णालयात भीषण आग, 2 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना सोमवारी (आज) पहाटे ही दुर्घटना घडली.

दरम्यान या आगीमध्ये दोन रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या वॉर्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीनं दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आहे.

मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूर शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीती असताना या आगीच्या घटनेमुळे रुग्णांच्या मनात भीतीचं वातावरण असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.