Pimpri : कोल्हापूर, सांगली शहर स्वच्छ करण्यासाठी पिंपरी महापालिकेने पाठविले 14 हजार खराटे 

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत आहे. पाणी ओसरत असल्याने युद्धपातळीवर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता पिंपरी महापालिकेकडून 14 हजार खराटे, 400 घमेली आणि दीड हजार मास्क पाठविण्यात आली आहेत. 

_MPC_DIR_MPU_II

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरपरिस्थिती निवळत चालली आहे. पाणी हळूहळू ओसरत आहे. आता आजार परसरण्याची भिती आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. त्याकरिता साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेने 14 हजार खराटे, 400 घमेली आणि दीड हजार मास्क जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, कोल्हापूरला पाठविण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.