Kolhapur : संस्कार प्रतिष्ठानची भाऊबीज पुरग्रस्तांसोबत

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि संस्कार प्रतिष्ठान कोल्हापुर विभागाच्या वतीने करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथील पूरग्रस्त कुटुंबांसमवेत भाऊबीज व दिवाळी सण उत्साहात पार पडला.

बुधवारी (दि 30) संपूर्ण दिवसभर नागदेववाडीतील 80 कुटुंबांना रवा, मैदा, साखर, तेल, उटणे, साबण, आकाश कंदील व साडी असे किट तयार करुन संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात आले. सायंकाळी ५ नंतर प्रत्येक घराच्या पुढे रांगोळी काढून त्या घरांना आकाश कंदील लावण्यात आले. त्यानंतर रात्री प्रत्येक रांगोळीवर पणत्या लावून पुरग्रस्तांची दिवाळी प्रकाशमय केली. त्यासोबत लाडू व चिवड्याची पाकिटे वाटण्यात आली. लाडू चिवड्याची मदत गौरी पेंडसे, किरण देवोलकर, वीरेंद्र केळकर यांनी मदत केली

संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड आणि कोल्हापुर जिल्हा प्रमुख सचिन जरग व रेवती जरग यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.आकाश कंदीलसाठी पराग कुंकूहोळ यांनी मदत केली. सहगामी फौंडेशन रावेत, 10 इलाईट सोसायटी पिंपळे गुरव, साई किडस् , चिंंचवड सातारा जिल्हा मित्र मंडळ सांगवी यांनी मदत केली. तसेच डॉ. दीपाली हेबरे, जयंत सावंत, प्रभाकर मेरुकर, बळवंत ठुबे, वसंत दळवी, विजयश्री चितलांगे, मारुती शेलार, प्राजक्ता रुद्रवार यांनी मदत केली.

पूरग्रस्तांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यासाठी डॉ मोहन गायकवाड यांच्यासोबत रमेश सरदेसाई, रवींद्र चव्हाण, रंजना जोशी, सिध्दी जोशी, भरत शिंदे, अनुराधा शिंदे, मिलन गायकवाड, शब्बीर शेख, मनोहर कड, आनंद पुजारी, रुपाली कड, प्रिया पुजारी, मोहिनी कर्णिक इ सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.