Kolkata : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज- लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे आज सकाळी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते. हा विकार बळावल्यानं 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.