Kondhva : सात मजली इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोंढवा परिसरातील एका सात मजली इमारतीवरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबीनाज आयाज शिकलगार (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. मयत महिला मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला कोंढव्यात कुटुंबियांसह राहण्यास होती. तिचा पती रिक्षाचालक असून घरी दोन मुले असतात. आज सकाळी पती रिक्षा घेऊन गेल्यानंतर घरी मुले आणि मयत महिला होते. साडेआठ वाजण्याच्या सुमारास मयत महिला जवळच राहणाऱ्या बहिणीकडे जाऊन येते,असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर जवळच असलेल्या हदीया हौसिंग सोसायटीच्या एका सात मजली इमारतीवर जाऊन खाली उडी मारली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.