-MPC-TOP-MOST-BANNER-I

Kondhwa Crime News : तलवारीचा धाक दाखवून दिवसभराच्या कमाईचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भाजी विक्रीतून दिवसभरात जमा झालेले पैसे रात्रीच्या वेळी मोजत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी तलवारीचा धाक दाखवून जबरदस्तीने काढून नेले. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ नगर गल्ली क्रमांक 4 जवळ हा प्रकार घडला. 

याप्रकरणी भिवाजी एकनाथ डोंबाळे (वय 37) यांनी फिर्याद दिली असून दुचाकीवरील तीन अज्ञात इसमा विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. मार्केटयार्ड मधून भाजी खरेदी केल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही भाजी विकत असतात. रविवारी ते बटाटे विक्री करण्यासाठी खोपोली येथे गेले होते. बटाटे देऊन रात्री उशिरा ते पुण्यात परत आले. त्यावेळी रात्रीच्या सुमारास कात्रज कोंढवा रस्त्यावरील गोकुळ नगर गल्ली समोर त्यांचा टेम्पो पंचर झाला होता. त्यानंतर त्यांनी एका नातेवाईकाला बोलावून घेतले होते.

फिर्यादी आणि संबंधित नातेवाईक टेम्पोत बसून दिवसभराच्या कामाचे पैसे मोजत होते. इतक्यात टीका पल्सर दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या मानेला कोयता लावला तर दुसऱ्याने नातेवाईकाला पकडून ठेवले. तर तिसऱ्याने फिर्यादी जवळ असणारी रोख 28 हजार रुपये आणि त्यांचा मोबाईल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला आणि पळून गेले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.