Kondhwa Crime news : चॉकलेट खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, दुकानदार अटकेत

एमपीसीन्यूज : चॉकलेट खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 50 वर्षीय दुकानदारांनी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे.

नवीन अमृतलाल चव्हाण (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीचे कोंढवा परिसरात किराणा सामानाचे दुकान आहे. फिर्यादीची 12 वर्षीय मुलगी त्याच्या दुकानात शनिवारी दुपारच्या सुमारास चॉकलेट खरेदी करण्यासाठी गेली होती.

त्यावेळी आरोपीने ‘तुला नवीन चॉकलेट दाखवतो’ असे आमिष दाखवत तिला दुकानातील एका कोपऱ्यात नेले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. घरी गेल्यानंतर या मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.