Kondhwa Crime News : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

एमपीसीन्यूज : पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्याच्या नैराश्यातून एका अभियंता तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऋषिकेश मारुती उमाप (वय 29, ठोसरनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हृषीकेशचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तर त्याचा एक भाऊ बंगळूर येथे नोकरीस आहे. सध्या तो कुटुंबासोबत कोंढव्यात राहत होता.

आज सकाळी 10 वाजले तरीही त्याने दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरून ससून रुग्णालयात पाठवले.

दरम्यान कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर ऋषिकेशची नोकरी गेली होती. यामुळे तो मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. याच काळात त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन हे लागले होते. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.