Kondhwa : खुनाच्या तयारीत असलेल्या सराईताला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – केवळ संश्यावरून पत्नीच्या मित्राच्या (Kondhwa) खूनाच्या तयारीत असलेल्या सराईताला शस्त्रासह पुणे पोलिसांच्या युनीट पाच गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.6) कोंढवा येथे केली.

अरबाज उर्फ लॅब इलियाज खान (वय 24 रा. कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी खबर मिळाली की, एक इसम हा हातात सुरा घेऊन खून करण्याच्या तयारीत आहे.

Bhor : 70 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भोर येथील उपअभियंत्याला अटक

त्यानुसार पोलीस कोंढवा येथील लक्ष्मीनगर परिसरात पोहचले व त्यांनी शिताफीने अरबाज याला सुऱ्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नीचा मित्र हा पत्नीला व मला त्रास देत होता त्याला मारण्यासाठी जात असल्याचे कबुल केले. अरबाज विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Kondhwa) आहे.

अरबाज हा रकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दंगल असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शस्त्रासह परिसरात दहशत पसरवण्याच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.