Talegaon News : कोकणचा हापूस मावळात दाखल 

एमपीसी न्यूज – कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या पेट्या ‘एनएमपी मँगो’च्या माध्यमातून मावळात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे आबांच्या हंगामाचा मनसोक्त आनंद घेता आला नाही याचा व्यापा-यांनाही फटका बसला होता. यावेळी मात्र, लोकांसह व्यापा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

सर्वांना प्रतीक्षा लागून असलेल्या कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामातील पहिल्या पेट्या तुकारांम नगर, तळेगाव दाभाडे येथील ‘एनएमपी मँगो’च्या माध्यमातून मावळात दाखल झाल्या आहेत. मावळात ‘एनएमपी मँगो’ हा आपल्या उत्कृष्ट दर्जा आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो. देवगड येथील आंबा बागेतून मंगळवारी (दि. 02) या पेट्या तळेगावात दाखल झाल्या आहेत.

कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मावळवासीयांसाठी तो ‘एनएमपी उद्योग समूहाचे प्रशांत ठोके व चेतन दाभाडे यांनी उपलब्ध केला आहे. ‘एनएमपी मँगो’चे डायरेक्टर प्रशांत ठोके म्हणाले, मावळ मधील जनतेला अस्सल आणि ओरिजनल रत्नागिरी व देवगड हापूस आंबा उपलब्ध व्हावा हाच आमच्या समूहाचा उद्देश आहे. गेल्या वर्षी देखील कोरोना काळात मावळवासायांसाठी कोकणचा हापूस आम्ही उपलब्ध केला होता.

प्रशांत ठोके पुढे म्हणाले, सध्या डजनाचे दर 1800 ते 2000 रुपये आहेत. कोकनातून आंब्याची आवक वाढेल तसे दर कमी होतील, साधारण एप्रिलच्या सुरवातीस आंब्याचे दर कमी होतील असे ठोके म्हणाले. लोणावळा, तळेगाव परिसरातील नागरिकांना घरपोच मोफत डिलिव्हरी दिली जाईल असे ठोके म्हणाले. कोकणच्या हापूस आहे असा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ठोके यांनी नमूद केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.