Kopargaon News : पोटगी वसुलीचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयासमोर उपोषण

एमपीसी न्यूज : एका खटल्यामध्ये पत्नीला द्यावी लागणारी पोटगी रकमेच्या वसुलीसाठी कोपरगाव दिवाणी न्यायालयाने थेट पतीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयाच्या विरोधात पोटगी वसुलीचा आदेश रद्द करून घटस्फोट मिळावा या मागणीसाठी पती संदीप धनवटे आणि पोटगी बंद आंदोलन संघटनेचेे अतुल छाजेड न्यायालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

कोपरगाव दिवाणी न्यायालयात पती संदीप तानाजी धनवटे यांनी त्यांची पत्नी प्रतिभा संदीप धनवटे यांच्याकडून घटस्फोट मिळण्यासाठी खटला दाखल केला होता. त्यावरील सुनावणीत आदेश देताना पत्नीला द्यावी लागणारी पोटगी रकमेच्या वसुलीसाठी कोपरगाव दिवाणी न्यायालयाने थेट पतीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

मात्र, हा पोटगी वसुलीचा आदेश रद्द करून घटस्फोट मिळावा या मागणीसाठी पती संदीप धनवटे आणि ‘पोटगी बंद आंदोलन’ संघटनेचेे अतुल छाजेड न्यायालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.