Koregaon Bhima : विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास आज, बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. शूरवीरांच्या आठवणी मनात ठेवण्यासाठी सर्वानी या ठिकाणी भेट देऊन अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

अजित पवार यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ” कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला वेगळा इतिहास आहे. दरवर्षी अभिवादनासाठी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. मध्यंतरी काही वाईट घटना घडल्या होत्या. परंतु सरकार त्याबाबत चांगली खबरदारी घेत आहे. कोणत्याही प्रकारे अफवा पसरविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये. कारण जातीय सलोखा राखण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे ही परंपरा आपण सर्वानी जतन केली पाहिजे” असे त्यांनी आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.