Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या जेवणाची सोय

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथे सालाबादप्रमाणे १ जानेवारी रोजी लोटणारा जनसमुदायाच्या दिमतीला हजारो पोलीस कर्मचारी व अधिकारी सुमारे ४८ तास सलग पहारा देत असतात. गेली १० वर्षे पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ पुणेतर्फे संपूर्ण पोलीस दलाचा जेवणाचा खर्च उचलला जात आहे.

याही वर्षी संघटनेच्या वतीने रक्कम रु ३ लाख रविवारी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलास लांडे कार्याधक्ष, प्रदीप कंद, कार्याध्यक्ष रामभाऊ दाभाडे, सचिव तथा नगरसेवक योगेशबाप्पू ससाणे, तसेच सदस्य बाप्पू कंद, संतोष देशमुख, योगेश झुरुंगे इत्यादी पदाधिकारी यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक  प्रताप मानकर यांच्याकडे 3 लाख रुपये रोख सुपूर्द केले.

सामाजिक बांधिलकी म्हणून संघटना गेल्या 13 वर्षांपासून अशाच प्रकारे विविध उपक्रमांत मदत करीत असते. पोलिसांच्या विनंतीवरून दि. ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी 2020 या तीन दिवस क्रशर व्ययसायिक त्यांची वाहतूक पुणे – नगर रोडवरून संपूर्ण  बंद ठेवणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.