Koregaon Park : मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; चार परदेशी महिलांसह सात जणांना ताब्यात

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरच्या (Koregaon Park) व्यवस्थापकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रोडवरील विद्युतनगर सोसायटीत असलेल्या सिग्नेचर थाई स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना केंद्रात उपस्थित असलेल्या परदेशी महिलांबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकण्यापूर्वी एका डिकॉय ग्राहकाला पाठवून प्रकरणाचा तपास केला.

 

पोलिसांनी थायलंडमधील चार महिलांसह (Koregaon Park) सात जणांना ताब्यात घेतले असून मसाज सेंटरचे व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (वय 38) आणि गजानन दत्तात्रय आडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनकांबळे याला अटक करण्यात आली असून, महिलांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Bavdhan : गडचिरोली येथील भाजप नेत्यांच्या मुलीची पुण्यात आत्महत्या

तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, तसेच राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकळे, तुषार भिवरकर आणि रेश्मा कंक यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.