Pune News : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसी न्यूज : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमधील गुजरात कॉलनीत घडली. अनिकेत अशोक गायकवाड (वय 25, रा. संकुराज सोसायटी, संगम चौक, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेतचा भाऊ अमित (वय 31) याने या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिकेत कोथरूडमधील गुजरात कॉलनी परिसरातून पहाटे तीनच्या सुमारास निघाला होता. त्या वेळी सुंदरनगरी सोसायटीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला.

Rase Crime News : एकच कार दोघांना विकून केली सहा लाखांची फसवणूक

गंभीर जखमी झालेल्या अनिकेतचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.