Kothrud Crime News: धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून गतिमंद महिलेचा खून

एमपीसी न्यूज – कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका गतिमंद मुलींच्या संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून उचलून खाली फेकल्यामुळे एका 33 वर्षीय गतिमंद महिलेचा मृत्यू झाला. डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ममता मोहन डोंगरे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संस्थेतील एका 14 वर्षीय गतिमंद मुलीवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अनिता रामकिसन टापरे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन्ही मतिमंद मुली या सावली मतिमंद बहुविकलांग प्रतिष्ठान येथे राहतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत ममता डोंगरे ही संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवरून चालत असताना संस्थेतच राहणारी 14 वर्षीय गतिमंद मुलगी त्या ठिकाणी आली. तिने ममता डोंगरे हिला पाठीमागून पकडले आणि उचलून दुसऱ्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे  डोंगरेचा मृत्यू झाला. कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.