Pune: कोथरूडमधील गॅरेज चालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश, एक आरोपी गजाआड

Pune: Kothrud garage owner murder case: Police succeed, one accused arrested कोथरूड येथील गांधी भवन परिसरात सोमवारी सायंकाळी राकेश क्षीरसागर या तरुणाची पाच ते सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केली होती.

एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये एका गॅरेज चालकाचा सोमवारी कोयत्याने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाचा पोलिसांनी छडा लावला असून त्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत बावधने (वय 21) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील गांधी भवन परिसरात सोमवारी सायंकाळी राकेश क्षीरसागर या तरुणाची पाच ते सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केली होती.

कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेचे एक पथक या प्रकरणाचा तपास करत होते. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत बावधने हा बावधान परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बावधान परिसरातून प्रशांत याला अटक केली.

पोलिसांनी चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. मित्रासोबत झालेल्या वादातून खून केल्याचे त्याने सांगितले. इतर आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like