Kothrud: कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे. यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निक्षून सांगितले.

कोथरूडमधील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली.

राज्यघटनेमुळेच सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. तसेच, देशातील अल्पसंख्याक समाजाच्याहिताचे रक्षण झाले. मात्र, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या हिताचं रक्षण झाले नाही. त्यामुळे त्यांना तो देश सोडून भारतात आश्रयाला यावे लागले, त्या लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामध्ये कुणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. देशात या कायद्यावरून जे आंदोलन होत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.