kothrud : सासूने विचारलं केबल का बंद आहे, सुनेने थेट गळाच आवळला

The mother-in-law asked why the cable was off and the daughter-in-law strangled her कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. 

एमपीसी​ न्यूज -​ पुण्याच्या कोथरूड परिसरातील भुसारी कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. केबल का बंद आहे? अशी विचारणा करणाऱ्या सासूचा सुनेने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसंच तिला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी 59 वर्षीय सासूने तक्रार दिल्यानंतर सुनेविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी कोथरूड परिसरातील भुसारी कॉलनीत राहतात. घरातील केबल बंद असल्यामुळे फिर्यादी सासूने सुनेला केबल का बंद आहे, केबल वाल्याकडे तक्रार केली का? यामुळे चिडलेल्या सुनेने सासूला शिवीगाळ केली आणि गळा आवळून खून करण्याचाही प्रयत्न केला आहे. इतकच नाही तर सुनेने घरात आदळाआपट करत फिर्यादीच्या हाताचा चावा घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.