BNR-HDR-TOP-Mobile

Kothrud – पूर्ववैमन्यस्यातून दोन गटांमध्ये वाद ; चौघांना अटक तर तिघेजण गंभीर जखमी

एमपीसी – दोन गटांमध्ये पूर्ववैमन्यस्यातून झालेल्या वादामध्ये दोघेजण जखमी झाले असून याप्रकरणी पोलीसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) रात्री साडेदहा च्या सुमारास कोथरूड येथील जय भवानीनगर येथील दगडीवाळ येथे घडली.

समाधान बळीराम बागल(वय 18), अभिजित चिंतामन मराठे(वय 22), प्रणव शाहु शिंदे (वय 21) आणि आकाश बबन बारणे(वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.दिपक आडकर (वय 19, रा. कोथरूड), गणेश भरेकर (रा. कोथरूड) आणि महेश धाडवे अशी जखमी इसमांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी (दि.9) रात्री प्रसाद बारणे यांची आई आणि दिपक आडकर यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यामुळे दूस-या दिवशी त्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद झाले. या भांडणामध्ये कोयत्याने आणि चाकूने वार करण्यात आले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

Advertisement