Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयास न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – कोथुर्णे (Kothurne Case) येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबियांना वडगाव येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीने आर्थिक मदतीचा हात दिला. पीडित कुटुंबाला न्यायालयीन लढाईसाठी मदत व्हावी या उद्देशाने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांची मदत समितीकडून करण्यात आली आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विलास दंडेल, गणेश विनोदे, अनिल कोद्रे, अतुल राऊत, मंगेश खैरे, अविनाश कुडे, गणेश पं.ढोरे, शंकर ढोरे, अनिकेत भगत, अक्षय बेल्हेकर, विनायक लवंगारे, गणेश झरेकर, विकास कदम, दर्शन वाळुंज उपस्थित होते.

या दुर्दैवी घटनेमुळे स्वराच्या कुटुंबीयांवर आलेले दुःख हे फक्त त्यांच्या पुरते नाही, तर आज समाजातील प्रत्येक कुटुंबाला हे दुःख झाले आहे. सांत्वन करणे, मानसिक आधार देणे हे आपले कर्तव्यच आहे, पण स्वराला न्याय मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी (Kothurne Case) मदत नव्हे, कर्तव्य या जाणिवेतून म्हणून मदत देण्यात आली असल्याचे पंढरीनाथ ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.