Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील पीडितेला न्याय देण्यासाठी मनसे तिच्या कुटुंबियांसोबत सदैव भक्कमपणे उभी राहील

एमपीसी न्यूज – पवन मावळातील कोथुर्णे गावात (Kothurne Case) दोन दिवसापूर्वी सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. चिमुकलीला न्याय देण्यासाठी मनसे तिच्या कुटुंबियांसोबत सदैव भक्कमपणे उभी असल्याचे मनसे प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी सांगितले.
कोथुर्णे गावातील घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडित परिवारचे सांत्वन करण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी चांदेकर परिवाराच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन कुटुंबीयांना आधार दिला. तसेच या पुढे स्वराला न्याय देण्यासाठी संपूर्ण मनसे पक्ष हा कुटुंबीयांसोबत भक्कमपणे उभा असेल असे आश्वासन यावेळी रिटा गुप्ता यांनी कुटुंबीयांशी बोलताना दिले. यावेळी कुटुंबीय (Kothurne Case) व नातेवाईकांच्या वतीने राक्षसी कृत्य करणाऱ्या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी नगरसेविका सायली म्हाळससकर, मनसे महिला नेत्या ज्योती पिंजन, मनसे महिला आघाडी पिं.चिं शहर अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता गुजर, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, वैशाली बोत्रे, संगीता देशमुख, ज्योती सगर तसेच मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, सचिन भांडवलकर, मनविसे पिं.चिं शहर अध्यक्ष हेमंत डांगे, संजय शिंदे, अनिल वरघडे, तानाजी तोडकर, बाळा धनवले, मयूर चिंचवडे, राजेश औसरे, अनिकेत प्रभू, सुनील शिंदे, संग्राम भानुसघरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.