Pune : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत असल्याचे (Pune) दिसून आले. जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करुन दुकानांवर दगडफेक केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागिरकांना आरोपींनी बांबूने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या घटनेत आकाश किंडरे (वय 26, रा. उत्तमनगर) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी श्री गणेश वाघमारे (वय 22, रा. राहुलनगर, शिवणे) व प्रतीक संजय नलावडे (वय 24, रा. गंगा बिल्डींग, कोंढवे धावडे) यांना अटक केली आहे.

किंडरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आकाश किंडरे याची आरोपी वाघमारे, नलावडे यांच्याशी भांडणे झाली होती. आरोपी वाघमारे, नलावडे आणि तीन साथीदारांनी उत्तमनगर परिसरात किंडरेला गाठले.

Mumbai : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत स्थिर; उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट

त्याच्यावर कोयत्याने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना बांबूने मारहाण (Pune) केली. शेजारी असलेल्या चिकन विक्री व हेअर सलूनच्या दुकानावर दगडफेक करुन दहशत माजविली. पसार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.