Kozhikode Plane Accident Update: कोझिकोड विमान अपघातात पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 123 प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज – वंदे भारत अभियानांतर्गत दुबईवरून आलेले एअर इंडियाचे विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरून अपघात झाला आहे. धावपट्टीवरून घसरून पुढे खड्ड्यात ते विमान पडून त्याचे दोन तुकडे झाले. या दुर्घटनेत पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. विमानातील 123 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या भारतीयांना घेऊन वंदे भारत अभियानांतर्गत हे एअर इंडिया एक्सप्रेस विमान कोझिकोडला परतत होते. क्रू मेंबर्ससह एकूण 191 जण विमानात होते. त्या सर्वांना विमानातून बाहेर काढण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर विमानाने पेट घेतला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे

अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका व  एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. कोझिकोड परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.