Vadgaon Maval : मावळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील साळुंब्रे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सूसेन महाराज यांनी आपल्या वाणीतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.

या‌ कार्यक्रमाला  माजी आमदार योगेश टिळेकर, माजी महापौर राहुल जाधव तसेच पवना हॉस्पिटलचे डॉ. सत्यजित वाढोकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक शामराव राक्षे आदी उपस्थित होते.

स्नेहल बाळसराफ यांनी मंडळाचे उद्दिष्ट सांगून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील समाज प्रबोधनपर काही उदाहरणे दिली आणि कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव देखील केला.  कोरोनावीर म्हणून तालुक्यातील समाजबांधवांचा देखील सत्कार केला. महिलांचा लक्की ड्रॉ चा कार्यक्रम आणि हळदी कुंकूवाचा कार्यक्रम लक्षवेधी होता, तसेच सर्व महिलांना महापुरुषांची, संतांची पुस्तके देण्यात आली.

साळुंब्रे  गावातील  कार्यकर्ते तसेच त्यांना मदत करणारे  पंचक्रोशीतील चांदखेड, वडगाव, तळेगाव, माळवाडी, इंदोरी, सुदवडी, शेलारवाडी विविध भागातून आलेल्या समाज बांधवांचे आभार रविंद्र विधाटे यांनी मानले. क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सोहळा 2021 यशस्वी करण्यात विशेष सहभागी असणारे कार्यकर्ते.  रवी विधाटे, संदीप शिंदे, मनोज शिंदे,  नवनाथ शिंदे, रोहित गिरमे, समीर घुमटकर, स्वप्नील भुजबळ, गणेश आल्हाट माळी, किशोर शेवकर, दत्ता शेवकर, राहुल शेवकर, अक्षय मोईकर, किशोर माळी, स्वप्नील माळी आदी होते.

ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून महत्व पूर्ण जबाबदारी पारपाडणारे  दत्तात्रय बाळसराफ सर, दत्तात्रय  माळी चांदखेड, सुदेश गिरमे वडगाव, ज्ञानेश्वर विधाटे साळुम्ब्रे, बोरावके काका वडगाव, संजय आल्हाट माळी, नाणवली गावचे सर्वच जेष्ठ मार्गदर्शक, जगन्नाथजी शेवकर इंदोरी, गुलाब माळी शेलारवाडी, लक्ष्मणजी माळी शेलारवाडी, सुदवडी मंडळाचे तांबे, मोईकर, जंबुकर सर्व जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.