Chinchwad News : रमेश पतंगे संघ विचारांचे आधुनिक भाष्यकार- प्रा. डॉ. सदानंद मोरे

एमपीसी न्यूज –  रमेश पतंगे संघविचाराचे आधुनिक भाष्यकार आहेत,(Chinchwad News) असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी (दि.29) चिचंवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे बोलताना व्यक्त केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित दोन दिवसीय ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ समारोहाच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सदानंद मोरे बोलत होते. यावेळी रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, मधुरा पतंगे, डॉ. नीता मोहिते, प्रा. पूनम गुजर आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. मोरे पुढे म्हणाले की,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक जण आपल्याच कार्याची आपल्या हाताने हानी अथवा कार्यनाश करून घेतात. या पार्श्वभूमीवर अभ्यासक आणि कार्यकर्ता या दोन्ही आघाड्या पतंगे यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.  (Chinchwad News) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अलीकडच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासाचे अन् स्थित्यंतरांचे ते साक्षीदार आहेत. समरसता चळवळ हा संघाचा धोरणात्मक निर्णय होता. संविधानातील तरतुदींचा भावी काळात अर्थविस्तार करावा लागेल!” यावेळी रमेश पतंगे यांनी समरसता चळवळीच्या प्रारंभाविषयी माहिती देऊन संघ कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली, असेही मत त्यांनी मांडले.

Kasarwadi News : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह

नरेंद्र पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘संस्कृती संस्कारांचा वारसा’ या पाचव्या परिसंवादात श्रीकांत चौगुले यांनी ‘कथामृत’ या पुस्तकाविषयी बोलताना “कथा हा लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे!” असे सांगून कथांचा इतिहास कथन केला. रूपाली कालेकर यांनी पतंगे यांच्या विविध कथांचा विस्तृत आढावा घेतला; तर स्मिता जोशी यांनी लोककथांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. ‘तथागतांचे विचार’ या उज्ज्वला हातागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अंतिम परिसंवादात प्रा. रूपाली भुसारी यांनी ‘तथागत आणि श्रीगुरुजी’ यांच्यातील साम्यस्थळांची मांडणी केली. मारुती वाघमारे यांनी ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकावर भाष्य केले; तर ॲड. राणी सोनवणे यांनी ‘अब्राहम लिंकन ते ओबामा’ या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले.

दरम्यानच्या काळात मान्यवरांच्या हस्ते शाहीर आसाराम कसबे लिखित ‘आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. (Chinchwad News) स्वप्ना झिरंगे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. त्यानंतर समीर काळे, ईश्वर काळे, मुकेश भोसले या भटक्याविमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. नटराज जगताप यांनी सहभागी उपस्थितांचा परिचय करून दिला. रवींद्र गोळे यांनी सूत्रसंचालन केले. वीर चापेकर यांच्या स्तवनाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.