Pimpri : आळंदीचा कृष्णा चव्हाण ठरला ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’ चा मानकरी

एमपीसी न्यूज – सुनील पाथरमल मित्रमंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आळंदी येथील कृष्णा चव्हाण याने ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’ चा किताब जिंकला. तर आबासाहेब वेटम बेस्ट पोझर व राहुल नानक बेस्ट इन्प्रुव्हड बॉडीबिल्डर ठरला.

सुनील पाथरमल मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि.17) उत्साहात पार पडली. तरूणाईने मोठी गर्दी केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते झाले. शरीरसौष्ठव स्पर्धा ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’  या वर्षीचा किताब आळंदीच्या कृष्णा चव्हाण यांने पटकावला.

तसेच आबासाहेब वेटम यांना बेस्ट पोझर तर  राहुल नानक यांना बेस्ट इन्प्रुव्हड बॉडीबिल्डर म्हणून गौरवण्यात आले. विजेत्यांना बक्षीस वितरण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध वजनी गटात क्रमांक पटकावणार्या स्पर्धतील विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या वेळी अभिनेता साहिल खान, ओम भुतकर, हिना पांचाळ ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक डब्बू आसवानी, सावल तोतानी, अ‍ॅड. सुशील मंचरकर, रमेश सुतार, रमेश तेवलानी, धनाजी बारणे, बाळासाहेब वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित  होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like