Talegoan : कृष्णराव भेगडे शाळेचा ‘स्कीमर बोट’ प्रकल्प राज्य पातळीवर प्रथम क्रमांक

राष्ट्रीय पातळीवर संधी

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्याच्या ‘स्कीमर बोट’ प्रकल्पास राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला अाहे.  आता या प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवर संधी मिळणार आहे.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.5 वी च्या विद्यार्थ्यांनी चाकण येथे महिंद्रा कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या ‘ स्कीमर बोट ‘ बनविण्याच्या स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. आता हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर 22 डिसेंबर रोजी चंदिगड येथे होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

महिंद्रा कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सिद्धार्थ काकडे , वरदायिनी डाळिंबीकर , प्रतिभा पाटील , धनंजय ठोकळ या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांचा ‘ टर्न टेस्ट व वजन ‘ मध्ये प्रथम क्रमांक आला , त्यानंतर घेण्यात आलेल्या एकूणच सर्व चाचण्यांमध्येही शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. तसेच इ.6 वी च्या विद्यार्थ्यांचाही ‘जेट टॉय ‘ या प्रकल्पासाठीच्या सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक आला. यात श्रुती झावरे , उन्नती ठाकूर , रौनक यादव व जगन पांडा यांनी सहभाग घेतला होता.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका निशा सराफदार , पद्मजा सातव व शताब्दी गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे , संस्थेचे अध्यक्ष.संदिप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे यांनी अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनीही खूप कौतुक केले. या सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.